वळण

मीच माझा उरलो ना माझ्यात, प्रसंगें अवघी बदल स्वताहात, क्षणभर दुसऱ्या हसवाया, मी विकले माझ्या तत्वास, दुसरा गेला दुसऱ्या मार्गी, गोड नाते विसरून क्षणांत, मग नजर पडली त्या आरश्यात, मी ना ओळखले प्रतिबिंबास, वळण चुकले त्या वाटेवर, जेथे सोडून आलो मी स्वतहास, मीच माझा उरलो ना माझ्यात, मीच माझा उरलो ना माझ्यात. – आदित्य